2009 साली Brian Acton and Jan Coum या दोन व्यक्तींनी ही कंपनी सुरू केली.
Photo - WhatsApp
यांचा उद्देश होता कोणत्याही प्रकारे माहितीची देवाण घेवाण जसे की मेसेज, फोटो, विडिओ, कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट लगेच इच्छित व्यक्तिपर्यंत पोहोचावी ते ही अगदी फ्री आणि जाहिराती विना. त्या व्यक्तीनां जाहिरांतीची खूप चीड होती. म्हणून त्यांनी असे विना जाहिरांतीचे अँप्लिकेशन बनवले.
जेव्हा हे अँप्लिकेशन सुरू झाले तेव्हा अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाले आणि खूप लोकांनी याला डाउनलोड केले.
WhatsApp च्या मिळकतीचा/उत्पन्नाचा मुद्दा
आधी जेव्हा हे अँप्लिकेशन नव्याने चालू झाले तेव्हा काही देशात ते अगदी फ्री होते. मग याचा वाढता वापर बघून डाउनलोड साठी काही देशात हे $ 1 असे चार्जेस ठेवण्यात आले कारण रोज होणाऱ्या डेटाचा वापर हा खूप जास्त होऊ लागला आणि कंपनीची क्षमता कमी पडू लागली. तर काही देशात 1 वर्षानंतर renew करण्यासाठी चार्जेस ठेवले गेले. तर याप्रकारे WhastApp चे उत्त्पन्न होते. आणि येथे काम करणारे कर्मचारी देखील कमी होते, जे 50 होते असं सांगतात. त्यांना जास्त पगार देऊन ठेवले नव्हतं हे ही तितकंच खरं आहे.
Photo - WhatsApp Update 2019 | MessengerPeople
मग आला तो दिवस WhatsApp चा पूर्ण कायापालट नशीब बदलणारा
साल 2014, फेसबुक या अग्रगण्य कंपनीने $ 19 बिलियन किंमतीला याला विकत घेतले. ह्याला आजपर्यंतचा सगळ्यात मोठा करार म्हणला जातो. एक वेळ अशीही होती की Brian Acton आणि Jan Coum
यांना फेसबुक ने नोकरी मिळवण्याच्या अर्जात नाकारले होते.
का विकत घेतली फेसबुक ने WhatsApp
हा सौदा झाला तेव्हाच WhatsApp ने काही अटी व शर्ती यासहित शिक्कामोर्तब केले. त्यात ही एक अट होतीच की पूर्वी प्रमाणे यामध्ये जाहिराती दाखवता येणार नाहीत.
मग WhatsApp असे करणार तरी काय ज्याचे फेसबुकने एवढे पैसे मोजले?
तर WhatsApp त्याच्या Cookies मधील डेटा फेसबुकला देणार ज्याचा फायदा फेसबुक त्याच्या जाहिराती दाखवण्यासाठी करणार.
आता Cookies म्हणजे काय?
Photo - All You Need to Know About Internet Cookies and How to Manage Them
एखाद अँप आपण जेव्हा डाउनलोड करतो तेव्हा कोणत्या प्रकारची महिती बघत असतो, आपण त्यावर काय काय करत असतो हे रेकॉर्ड/सेव्ह करून ठेवत असते जेणेकरून त्या अँपच्या कंपनीला त्यांचे अँप अजून कसे उत्कृष्ट, दर्जेदार कसे बनविता येईल हा उद्देश असतो. पण आता हा डेटा व्हाट्सअप्प फेसबुकला देणार.
फेसबुकने ही कंपनी विकत घेतली कारण फेसबुक नंतर सर्वात जास्त वापरकर्ते असतील तर कोणाचे ते WhatsApp चे.
दुसऱ्या प्रकारे WhatsApp चे उत्पन्न म्हणजे हल्लीच WhatsApp ने चालू केलेली WhatsApp For Business सुविधा.
तुम्ही एखादा Business करत असाल आणि ज्याला WhatsApp ची गरज असेल, मदत लागेल तर या माध्यमातून WhatsApp पैसे आकारते.
उदा. माझा फूड डिलिव्हरीचा Business आहे. कस्टमरने WhatsApp करून त्याला जे पाहिजे ते ऑर्डर केल त्यानंतर ती ऑर्डर त्यापर्यंत पोहेचेपर्यंत त्याची अपडेट्स त्याला WhatsApp वर मिळत राहतील.
तर तुम्हाला कळले असेल की एकपण जाहिरात नसूनसुद्धा WhatsApp पैसे कसे कमावते.
तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल…🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा