मंगळवार, १६ जून, २०२०

काळजातल्या काळजीच्या गोष्टी


#आमुची_Anniversaryनाहीय_आज_3O_डिसेंबरला_असते.
#फोटो_शेअर_करण्याचा_हेतू_हा_होता_की 

#जगू_की_मरु_याचा_नाहीय_भरवसा.
#म्हणून_व्यक्त_झालो_मी_जरासा....

या जगात कितीही संकटे आली तरीही शेवटी खंबीरपणे आपल्यासाठी आपल्यापाठी सावली बनून उभी असणारी अलौकिक शक्ती म्हणजे आपलं कुटूंब होय.

#संवाद #संबोध #संवेद #संयोगिता #सुमित_सरवदे

जगाशी भांडून कधी...
तर कधी गोड बोलून...
माणूस साधत असतो
स्वार्थ सडेतोड बोलून तर 
कधी तडजोड करून...
का कुणासाठी...?
.
जेंव्हा जग विरोधात जातं...
तेंव्हा हक्काचं पाठीशी जे उभे राहतात...
ते आपले प्रियजन,
म्हणजेच आपली फॅमिली,
कुंटूब,परिवार.
.
वडिलांच्या आकस्मिक जाण्यानं...
लहान बहिणीचीही साथ सुटल्यानं...
एकटा, एकाकी पडलेल्या माझ्या मनाला
आवरण्याचं आणि सावरण्याचं 
माझे मलाही अशक्य जेंव्हा झाले...
तेंव्हा माझे म्हणणारेही विरोधात गेले...
.
माझ्या आई,बहिण,आणि लहान भाऊ
यांचे साठी कांहीच करू शकत नसल्याची खंत
मी बऱ्याचदा माझ्या सुसाइट नोटमध्ये लिहायचो..?
मानसिक ताणतणाव इतका प्रचंड होता की,
जगण्यापेक्षा मरण सोईचं वाटू लागलं...
रोज नवनवे अशस्वी "#मृत्यूचे_प्रयोग" करू लागलो.
.
पण माझ्या नंतर आई अन् बहिण भावंडाचे काय?
हा प्रश्न त्या मरणापेक्षाही जास्त महत्वाचा वाटला.
शेवटी आई वडिलांचे संस्कार कामी आले.
वडिलांनी वाचनाचे वेड लावले होतेच,
मरणाचे १०१ टिप्सऐवजी आता जगण्यासाठी
 आवश्यक अशा वैचारिकतेची शोधमोहिम सुरू केली.
.
आयुष्याला पुरून उरेल एवढी 
शिदोरी पुस्तकांच्या रुपात वडिलांनी मला दिलेली होती...
.
परिस्थितीने बिघडवलेल्या मनाच्या अस्थिरतेला वडिलांच्या आदर्श विचारांनी घडविले.स्थिर केले.
.
आणि मग जगावे कुणासाठी तरी हा स्वार्थ आला.
.
कांही गोष्टी व्यक्त करण्यासारख्या असतात तर कांही मनातच विरून ठेवाव्या वाटणाऱ्या ...
.
पण जेंव्हा भावना अनावर होते.
तेंव्हा पुन्हा पुर्वीसारखी चिडचिड व्हायला लागायची...
सातत्य नव्हते कामात कसले तरीही,
आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती तुसड वागायची...
.
मला समजून सांगणाऱ्यापेक्षा 
समजून घेणाऱ्याचीच खरी तर गरज होती...
.
जो तो वेडयात काढायचा अन् मी वेडा ठरायचो...
.
माझ्यातला आत्मविश्वास आता वरवर
कमी कमी होऊ लागला होता...
.
मला चित्रकला आवडायची...
गाणे म्हणायला आवडायचे...
भाषण करायलाही आवडायचे...
फोटोग्राफी, तसेच अभिनय करायलाही आवडायचे...
.
पण याचाही विसर पडावा, त्याविषयीची आवड कमी व्हावी यासाठी कुणी याच्यावर करणी तर केली नसेल...
.
जो तो आपआपल्या परीने तर्क लावत होता.
.
उध्वस्त झालेला मी... कोण स्विकारेल मला असे घरातल्यांना वाटू लागले.
.
आणि एक दिवस पाहुणे आले.
पहिलेच स्थळ.
.
मला घर नाही. दार नाही.
नोकरी नाही. कामधंदा नाही.
जमिन जुमला. शेतीवाडी नाही.
काही काहीच नव्हते.
.
पण माझ्याकडे दिवंगत माझ्या वडिल्यांचे सत्कर्म होते.
त्यांचे शुभाशिर्वाद होते. त्यांचे पुरोगामी विचार होते.
तिला माझे विचार आवडले.
जगाला न दिसणाऱ्या माझ्या श्रीमंतीनं तिला म्हणे अगदी दिपवले.

शब्दांकन : सुमित रवि सरवदे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Security Supervisor का क्या काम होता है

Security Supervisor का क्या काम होता है इस पेज पर Security Supervisor का क्या काम होता है जानकारी दी गई है। यदि आप ने अभी तक सिक्योरिटी सुपर...